दिशा सालियन गँगरेप-हत्या आणि ‘कव्हर-अप’ प्रकरणात मोठी घडामोड! आदित्य ठाकरे, रिया चक्रवर्ती, परमबीर सिंहसह अनेकांविरुद्ध CBI द्वारे FIR दाखल

मुंबई : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आता तपासाला निर्णायक वळण मिळाले आहे. CBI ने नोंदविलेल्या FIR मध्ये गुन्हेगारी कट, सामूहिक बलात्कार, हत्या, पुरावे नष्ट करून आरोपींना वाचवणे तसेच आरोपींना शिक्षेपासून वाचवण्यासाठी कायद्याचे उल्लंघन करणे व चुकीचे सरकारी रेकॉर्ड तयार करणे अशा अत्यंत गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा उल्लेख करण्यात आला आहे.

FIR मध्ये IPC कलम 120-B, 376-D, 302, 201, 217 आणि 218 तसेच त्यासंबंधित मूळ गुन्ह्यांचा उल्लेख करण्यात आला आहे.

आदित्य ठाकरे यांच्यासह अनेकांविरुद्ध FIR दाखल

FIR मध्ये नमूद करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, मूळ गुन्हे, कथित गुन्हेगारी कट, त्यानंतर आत्महत्येची खोटी कथा रचून तिचा प्रसार करणे तसेच पुरावे दडपणे, नष्ट करणे अथवा बनावट पुरावे तयार करणे, या गंभीर आरोपांच्या अनुषंगाने आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक व्यक्तींच्या भूमिकेचा तपास करण्यासाठी FIR दाखल करण्यात आली आहे.

FIR मध्ये नमूद आरोपांनुसार, या संपूर्ण प्रकरणात मूळ गुन्ह्यातील सहभागापासून ते त्यानंतर कथितरीत्या करण्यात आलेल्या ‘कव्हर-अप’पर्यंत कोणाची काय भूमिका होती, याचा सखोल तपास CBI कडून केला जाणार आहे.

FIR मध्ये नमूद नावांमध्ये अनेक व्यक्तींचा समावेश आहे. :- आदित्य ठाकरे, रोहन रॉय, डिनो मोरिया, सूरज पांचोली, आदित्य ठाकरे यांचे अंगरक्षक, रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, सचिन वाझे, परमबीर सिंह, डीसीपी विशाल ठाकूर, उद्धव ठाकरे, अनिल देशमुख, तसेच मालवणी पोलीस ठाण्याशी संबंधित अनेक तत्कालीन पोलीस अधिकारी आणि SIT मधील अधिकाऱ्यांच्या भूमिकेचा तपास करण्याची मागणी/आरोप FIR मध्ये नोंदविण्यात आले आहेत.

याशिवाय शवविच्छेदनाशी संबंधित डॉक्टर व कर्मचारी, डॉ. संजय जाधव, कलीना येथील न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेतील संबंधित अधिकारी, सहायक रासायनिक विश्लेषक एन. पी. भाले, रीजेंट गॅलेक्सी इमारतीचे सुरक्षा कर्मचारी तसेच प्रकरणाशी संबंधित विविध साक्षीदार आणि अन्य अज्ञात व्यक्तींच्या भूमिकेचाही तपास अपेक्षित असल्याचे FIR मधील मजकुरातून दिसते.

दिशाच्या मोबाईलमधील माहिती आणि ‘अनेक हत्या’ — गंभीर आरोप

या प्रकरणातील आणखी एक अत्यंत गंभीर बाब म्हणजे दिशा सालियन यांच्या मोबाईल फोनमध्ये असलेल्या संवेदनशील माहितीचा आणि त्यानंतर घडलेल्या कथित घटनांचा संबंधही तपासाच्या कक्षेत आणण्यात आला आहे.

FIR मध्ये नोंदविण्यात आलेल्या आरोपांनुसार, दिशाच्या मोबाईलमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींकडून अन्य काही व्यक्तींच्या हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे दिशा सालियन यांचा मोबाईल नेमका कोणाच्या ताब्यात होता, त्यातील कोणती माहिती कोणी पाहिली किंवा मिळवली, ती माहिती कोणाला पाठविण्यात आली, डेटा डिलीट अथवा फेरफार करण्यात आला का आणि त्या माहितीचा इतर कथित हत्यांशी काही संबंध आहे का—या सर्व बाबी CBI तपासासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत.

पोलीस अधिकाऱ्यांची भूमिकाही रडारवर

या FIR चे सर्वात गंभीर वैशिष्ट्य म्हणजे प्रकरण केवळ कथित गँगरेप आणि हत्येपुरते मर्यादित नसून हत्या झाल्यानंतर आरोपींना वाचवण्यासाठी पुरावे नष्ट करणे, खोटी माहिती देणे, चुकीचे सरकारी रेकॉर्ड तयार करणे आणि कायद्याच्या निर्देशांचे जाणीवपूर्वक उल्लंघन करणे, या कथित कव्हर-अपचाही तपास त्यात समाविष्ट आहे.

त्यामुळे मूळ गुन्ह्यात कोण सहभागी होते याबरोबरच आत्महत्येची कथित खोटी कथा कोणी तयार केली? ती कोणी पसरवली? पुरावे कोणी दडपले किंवा नष्ट केले? सरकारी अथवा पोलीस रेकॉर्डमध्ये फेरफार कोणी केला? आणि आरोपींना वाचवण्यासाठी सरकारी यंत्रणेचा गैरवापर झाला का? या प्रश्नांची उत्तरे आता CBI तपासातून शोधली जाणार आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *