मुंबई : दिशा साळियान प्रकरणात पुन्हा एकदा “मी तिला कधी भेटलो नाही, मी तिला ओळखत नाही” असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. 16 सप्टेंबर 2026 रोजी केलेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, “I have never met or known Disha Salian.” तसेच आपले नाव या प्रकरणाशी जोडणे हा संपूर्ण प्रकार राजकीय व वैयक्तिक हेतूने चालवलेला बदनामीचा प्रयत्न असल्याचा आदित्य ठाकरे यांचा दावा आहे.
दिशा सालियन प्रकरणातही आदित्य ठाकरे यांनी असा दावा केला होता की, “8 जून रोजी मी तिथे नव्हतोच. माझे आजोबा पाटनकर वारले होते. मी डोंबिवलीला होतो, मुंबईच्या बाहेर होतो.”
मात्र, या दाव्याचा खोटेपणा यावरून उघड झाला आहे की, त्यांचे आजोबा पाटनकर हे 8 जून रोजी जिवंत होते आणि त्यांचे निधन 14 जून रोजी झाले होते. तसेच, 8 जून रोजी आदित्य ठाकरे यांचे मोबाईल टॉवर लोकेशन दिशा सालियनचा ज्या ठिकाणी मृत्यू झाला, त्याच परिसरात आढळून आले आहे.
याव्यतिरिक्त, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी आदित्य ठाकरे व इतर आरोपींनी दिशा सालियनवर अत्याचार करून तिची हत्या केली आणि त्यानंतर तिचा मृत्यू आत्महत्या असल्याचे भासविण्यासाठी पोलिसांसोबत मिळून षड्यंत्र रचल्याचा आरोप करत त्या संपूर्ण घटनाक्रमाची तपशीलवार माहिती दिली आहे. या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या जबाबांचा/माहितीचा व्हिडिओ असलेला पेनड्राईव्ह CBI कडे सुपूर्द करण्यात आलेला आहे.
त्यामुळे, 8 जून रोजी मुंबईबाहेर असल्याचा दावा, आजोबांच्या निधनाबाबत दिलेले कारण आणि त्याविरुद्ध समोर आलेली मोबाईल टॉवर लोकेशनची माहिती, तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी दिलेली माहिती—या सर्व बाबींमुळे हा व्यक्ती किती खोटे बोलतो, हे यावरून दिसून येते. तरीही त्यांचे अंधभक्त त्यांचा उदोउदो करत आहेत.
यापूर्वीही आदित्य ठाकरे यांनी वारंवार ‘मी याला ओळखत नाही’, ‘मी रिया चक्रवर्तीला ओळखत नाही’, ‘मी संजय गुप्ताला ओळखत नाही’ अशा स्वरूपाचे दावे केले होते. मात्र, त्यानंतर समोर आलेल्या पुराव्यांमुळे हे दावे खोटे असल्याचे उघड झाले आहे.
आदित्य ठाकरे यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्रामध्ये CBI ने दिशा सालियन प्रकरणाचा तपास करून त्यांना ‘clean chit’ दिली आहे, असा दावा केला होता. मात्र, त्यावर CBI च्या वकिलांनी न्यायालयासमोर मांडलेली वस्तुस्थिती उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्टपणे नोंदवली आणि आदित्य ठाकरे यांनी शपथपत्रात केलेल्या दाव्याप्रमाणे वस्तुस्थिती नसल्याचे स्पष्ट झाले. कारण, CBI ने दिशा सालियनच्या मृत्यूचा स्वतंत्र तपासच केलेला नव्हता. त्यानंतर या मुद्द्यावर आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयाची माफीही मागितली आहे.
यावरून, आदित्य ठाकरे वेळोवेळी खोटे दावे करत आहेत आणि विशेषतः दिशा सालियन प्रकरणात स्वतःला वाचविण्यासाठी खोटा बचाव उभा करत आहेत, हे स्पष्ट झाल्याचा आमचा आरोप आहे.
कायद्याच्या दृष्टीनेही हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. एखाद्या आरोपीने घेतलेला बचाव खोटा असल्याचे पुराव्याने सिद्ध झाल्यास, असा false defence हा आधीपासून अस्तित्वात असलेल्या incriminating circumstances च्या साखळीला अतिरिक्त बळ देणारा पुरावा असून खोटा बचाव हा तो व्यक्ती त्या गुन्ह्यातील अपराधी आहे आणि खून त्यानेच केला आहे असे माणून त्याला शिक्षा दिली जाऊ शकते असा कायदा आहे.[Prem Singh v. State (NCT of Delhi), (2023) 3 SCC 372 (paragraph 44) and Bajirao v. State of Maharashtra, 2004 SCC OnLine Bom 121]
रिया चक्रवर्ती प्रकरणातही आला होता हाच ‘ओळखत नाही’चा दावा!
सुशांत सिंह राजपूत प्रकरण चर्चेत असताना ऑगस्ट 2020 मध्ये रिया चक्रवर्तीने आपल्या वकिलामार्फत प्रसिद्ध केलेल्या निवेदनात स्पष्ट म्हटले होते की ती आदित्य ठाकरे यांना ओळखत नाही, त्यांना कधी भेटलेली नाही आणि त्यांच्याशी फोनवर किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून बोललेली नाही. Indian Express, India Today आणि Times of India यांनी त्या काळात हे विधान नोंदवले होते.
रियाने NDTV च्या मुलाखतीतही “आदित्य ठाकरे यांना कधी भेटले किंवा त्यांच्याशी बोलले नाही” असा दावा केला होता.
पुढे, NCB च्या तपासात रिया चक्रवर्तीच्या मोबाईलमधील तसेच तिच्याकडून वापरण्यात येणाऱ्या दुसऱ्या मोबाईलमधील WhatsApp chats तपासण्यात आले. त्या chats मधून आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्ती हे एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत होते, हे सिद्ध झाले.
तसेच, रिया चक्रवर्ती ही ड्रग्स डीलिंगच्या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर दिनो मोर्याला भेटण्यासाठी गेली होती. याशिवाय, दिनो मोर्या आणि आदित्य ठाकरे हे दोघेही मुंबईमध्ये ड्रग्सचा व्यवसाय करतात, हे NCB च्या Crime No. 15/2020 मधील फोन सर्व्हिलन्स रेकॉर्ड आणि फोन रेकॉर्डिंगमधून सिद्ध झाले आहे.
संजय गुप्तांबाबतही—‘फ्रॉड’ म्हणत झटकले हात!
हा प्रकार फक्त दिशा सालियन किंवा रिया चक्रवर्तीपुरता मर्यादित नाही.
27 जानेवारी 2025 रोजी आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर “a fraud named Sanjay Gupta” असा उल्लेख करून, संजय गुप्ता यांना शिवसेना (UBT)चे अधिकृत प्रवक्ते म्हणून माध्यमांनी संबोधल्याबद्दल आक्षेप घेतला आणि संबंधित माध्यमांविरुद्ध कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला होता.
यानंतर मात्र संजय गुप्ता यांनी स्वतःला पक्षाकडून प्रवक्ता म्हणून नियुक्त करण्यात आल्याचे नियुक्तीपत्र तसेच आदित्य ठाकरे यांच्यासोबतचे फोटो माध्यमांसमोर सादर केले. त्यावर आदित्य ठाकरे यांच्याकडून एकही ठोस प्रतिवाद करण्यात आला नाही किंवा त्या कागदपत्रांना उत्तर देण्यात आले नाही.
इतकेच नव्हे, तर India Todayसह विविध वृत्तवाहिन्यांवरील अनेक चर्चांमध्ये संजय गुप्ता यांना आदित्य ठाकरे यांच्या पक्षाचे प्रवक्ते म्हणूनच आमंत्रित करण्यात आले होते आणि त्यांनी त्या नात्याने अनेक debates मध्ये सहभाग घेतला होता.
त्यामुळे या संपूर्ण घटनाक्रमावरून त्यांच्या दाव्यांच्या सत्यतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होतात.
म्हणजे पॅटर्नकडे पाहा—
वाद निर्माण झाला की समोरचा माणूसच अनोळखी?
संबंधावर प्रश्न उपस्थित झाला की—‘मी ओळखत नाही’?
पुरावे समोर आले की त्यावर मौन?
आणि पुराव्याची मागणी झाली की—राजकीय षड्यंत्राचा आरोप?
हायकोर्टातील ‘CBI Clean Chit’चा दावा तर आणखी गंभीर!
दिशा साळियान प्रकरणातील सर्वात गंभीर मुद्द्यांपैकी एक म्हणजे आदित्य ठाकरे यांच्या न्यायालयीन भूमिकेबाबत उपस्थित झालेला “CBI clean chit” वाद.
सतीश साळियान यांच्या बाजूने असा आरोप करण्यात आला की आदित्य ठाकरे यांनी न्यायालयातील शपथपत्रात CBI ने दिशा साळियान प्रकरणाची चौकशी करून त्यांना clean chit दिल्याचा दावा केला होता. मार्च 2025 मध्येही अॅड. निलेश ओझा यांनी सार्वजनिकपणे म्हटले होते की CBI ने आदित्य ठाकरे यांना दिशा साळियान प्रकरणात कोणतीही clean chit दिलेली नाही.
सप्टेंबर 2026 मध्ये सतीश साळियान यांनी पाठवलेल्या ₹500 कोटींच्या मानहानी नोटीसमध्येही हा मुद्दा स्पष्टपणे उपस्थित करण्यात आला आहे—नोटीसमध्ये आदित्य ठाकरे यांनी CBI ने प्रकरण तपासून clean chit दिल्याचे चुकीचे representation केल्याचा आरोप आहे.
शपथपत्रातील विधान साधी राजकीय पत्रकार परिषद नसते. न्यायालयासमोर शपथेवर केलेल्या प्रत्येक विधानाची जबाबदारी असते.
‘मी आमदार नाही; businessman/social worker’ — हा मुद्दाही उत्तर मागतो!
सतीश साळियान यांच्या कायदेशीर बाजूकडून आणखी एक गंभीर आक्षेप नोंदवण्यात आला आहे—आदित्य ठाकरे यांच्या शपथपत्रातील वर्णनात त्यांनी स्वतःचा उल्लेख “businessman and social worker” असा केल्याचा आणि आपला आमदार म्हणून असलेला दर्जा नमूद न केल्याचा आरोप आहे. हा आरोपही सार्वजनिक मुलाखतीत मांडण्यात आला आहे.
यावर प्रश्न अगदी साधा आहे—
शपथपत्र दाखल करण्याच्या संबंधित दिवशी आदित्य ठाकरे हे आमदार होते की नव्हते?
जर होते, तर affidavit मध्ये त्यांचा occupation/status नेमका कसा नमूद करण्यात आला आणि का, हे मूळ शपथपत्रावरून तपासले जाऊ शकते. यासाठी राजकीय भाषणाची गरज नाही—दस्तऐवज स्वतः बोलू शकतो.
आदित्य ठाकरे यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्रामध्ये आपण आमदार (MLA) असल्याची बाब लपवून ठेवून, आपण “Businessman/व्यापारी” असल्याचे खोटे नमूद केले, असाही गंभीर आरोप आहे.
असे खोटे शपथपत्र देण्यामागील उद्देश हा होता की, जर त्यांनी आपला व्यवसाय/पद “आमदार” म्हणून नमूद केला असता, तर संबंधित प्रकरण MP-MLA Court/Fast Track Court समोर चालविण्याचा प्रश्न निर्माण झाला असता आणि प्रकरणाचा तातडीने निकाल लागण्याची शक्यता निर्माण झाली असती.
त्यामुळे, CBI ने ‘clean chit’ दिल्याचा कथित खोटा दावा, आपल्या आमदारपदाची बाब शपथपत्रात लपवून स्वतःला ‘Businessman’ म्हणून दाखविणे आणि त्यामागे प्रकरण MP-MLA Court/Fast Track Court समोर जाऊ नये असा हेतू असल्याचा आरोप—या सर्व बाबी एकत्रितपणे पाहिल्यास, त्यांचा खोटेपणा वारंवार सिद्ध होत चालला आहे आणि न्यायालयीन कार्यवाहीतही खोटे बचाव उभे करण्याचा एक सातत्यपूर्ण pattern समोर येत आहे.
मग आता फक्त एकच मागणी—‘मी ओळखत नाही’वर विश्वास ठेवू नका; पुरावे तपासा!