काळाने डाव पलटवला! सत्तेच्या मस्तीला न्यायालयात आरसा!!

सतीश सालियन यांच्या बाजूने वकिलांची फौज; आदेशात 26 नावे, कोर्टात जवळपास 50 वकील! आदित्य ठाकरेंच्या बाजूने अवघे 5!

मुंबई : काळाचे चक्र फिरते तेव्हा भल्याभल्यांची गणिते उलटी होतात! सत्ता, पैसा आणि राजकीय प्रभावाच्या जोरावर एखाद्या सामान्य माणसाचा आवाज दाबता येईल, त्याला एकटे पाडता येईल आणि त्याच्या न्यायाच्या लढाईत कोणीही उभे राहणार नाही, असा कुणाचा समज असेल तर 28 ऑगस्ट 2026 रोजी मुंबई उच्च न्यायालयात दिसलेले चित्र त्यांच्यासाठी सणसणीत उत्तर ठरावे!

मुंबई उच्च न्यायालयाच्या 28 ऑगस्टच्या आदेशाकडे जरा नीट पाहा!

दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांच्या बाजूने उच्च न्यायालयाच्या आदेशात तब्बल 26 वकिलांची नावे नोंदविण्यात आली आहेत, तर प्रत्यक्षात त्यांच्या समर्थनार्थ न्यायालयात जवळपास 50 वकील उपस्थित होते!

आणि दुसऱ्या बाजूला?  आदित्य ठाकरे यांच्या बाजूने अवघे 5 वकील!

आज दिशा सालियनच्या वडिलांच्या न्यायाच्या लढाईत देशातील नामांकित, विद्वान आणि सामाजिक बांधिलकीतून काम करणाऱ्या वकिलांची अक्षरशः फौज उभी राहिली आहे.

न्यायालयात या वकिलांनी केलेला कायदेशीर युक्तिवाद सर्वांनी पाहिला. कागदपत्रे, कायद्याच्या तरतुदी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांच्या आधारे एकामागून एक मुद्दे न्यायालयासमोर मांडण्यात आले.

आणि परिस्थितीने अशी कलाटणी घेतली की— अखेर आदित्य ठाकरे यांच्या वकिलांवर उच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागण्याची पाळी आली!

ज्यांना एकटे आणि कमजोर समजले, त्यांच्या बाजूने आज विद्वान वकिलांची फौज उभी आहे; आणि ज्यांच्या पाठीशी सत्ता, पैसा राजकीय प्रभावाचे बळ असल्याचे मानले जात होते, त्यांच्या वकिलांना न्यायालयात माफी मागावी लागलीकाळाने फिरवलेला डाव यापेक्षा बोलका आणखी काय असू शकतो!

 एका बापाची जिद्द विरुद्ध सत्तेचे सामर्थ्य!

 

एका बाजूला राजकीय सत्ता, पैसा, पद आणि प्रभाव…

दुसऱ्या बाजूला आपल्या मुलीसाठी न्याय मागणारा एक पिता!    – सतीश सालियन!

सत्ता आणि राजकीय ताकद हातात आली की काहींना वाटू लागते की सामान्य माणसाचा आवाज सहज दाबता येतो. त्याला एकटे पाडता येते. त्याच्याविरोधात संपूर्ण यंत्रणा उभी करता येते आणि शेवटी त्याच्यासाठी लढायला कोणी उरणार नाही.

पण सत्तेच्या मस्तीत एक गोष्ट विसरली जाते—

सत्तेपेक्षाही मोठी ताकद असते ती काळाची!

ज्या सतीश सालियन यांना गरीब, कमजोर आणि एकटे समजले गेले असेल, त्याच पित्याच्या न्यायाच्या लढाईत आज अनेक अनुभवी आणि नामवंत वकील खांद्याला खांदा लावून उभे आहेत.

28 ऑगस्टला उच्च न्यायालयातील चित्रच बोलके होते.

आदेशात 26 वकिलांची नावे! प्रत्यक्ष न्यायालयात समर्थनार्थ जवळपास 50 वकील!

आणि आदित्य ठाकरे यांच्या बाजूने— फक्त 5!

 

वरून खोट्या प्रतिज्ञापत्राच्या वादात बिनशर्त माफी!

याच सुनावणीदरम्यान आणखी एक नाट्यमय घटनाक्रम घडला.

आदित्य ठाकरे यांच्या प्रतिज्ञापत्रातील CBI तपास आणि कथित ‘क्लीन चिट’च्या दाव्यावर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर, CBI ने न्यायालयासमोर आपली भूमिका स्पष्ट केली.

त्यानंतर सतीश सालियन यांच्या वतीने ॲड. निलेश ओझा यांनी perjury आणि criminal contempt ची कारवाई करण्याची मागणी केली.

आणि दुसऱ्या दिवशी—

आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागितली!

या माफीला सतीश सालियन यांच्या वकिलांकडून तीव्र विरोध करण्यात आला असून, खोटे प्रतिज्ञापत्र, perjury आणि contempt च्या मुद्द्यांवरील अंतिम निर्णय अद्याप न्यायालयाने दिलेला नाही.

पण परिस्थितीने घेतलेली ही कलाटणी मात्र लक्षवेधी आहे!

 

ज्याला एकटा समजले, त्याच्यामागे आज फौज!

कालपर्यंत एखाद्या सामान्य पित्याचा आवाज सत्ता आणि प्रभावाच्या जोरावर दाबला जाऊ शकतो, असा कुणाचा समज असेल तर 28 ऑगस्टच्या न्यायालयातील दृश्याने तो भ्रम दूर व्हायला हवा.

ज्याला एकटा समजले, त्याच्या पाठीशी आज फौज उभी आहे!

ज्याला कमजोर समजले, त्याची न्यायाची लढाई आज अधिक ताकदवान झाली आहे!

आणि ज्यांना सत्ता व प्रभाव कायमस्वरूपी असल्याचा भ्रम असेल, त्यांच्यासमोर काळाने आरसा धरला आहे!

सत्ता आज आहे, उद्या नसेल.

पद आज आहे, उद्या नसेल.

पैसा आणि राजकीय प्रभावही कायम राहत नाही.

पण आपल्या मुलीसाठी न्याय मागणाऱ्या बापाची जिद्द सहज संपत नाही!

आज सतीश सालियन यांच्या पाठीशी उभी राहिलेली वकिलांची फौज त्याच जिद्दीचे प्रतीक आहे.

हाच काळाचा न्याय! हाच नियतीचा खेळ!!

काळ जेव्हा हिशेब करायला सुरुवात करतो, तेव्हा सत्ता, पैसा, पद आणि राजकीय प्रभावाची गणिते क्षणात उलटी होऊ शकतात.

आणि नियती जेव्हा डाव फिरवते, तेव्हा कालचे चित्र आज पूर्णपणे बदललेले असते!

सत्याचा आवाज काही काळ दाबता येईल…

न्यायाची वाट अडवता येईल…  लढणाऱ्याला एकटे पाडण्याचा प्रयत्नही करता येईल…

पण सत्याला कायमचे पराभूत करता येत नाही!

28 ऑगस्टच्या मुंबई उच्च न्यायालयातील चित्राने एवढे मात्र दाखवून दिले—

ज्याला एकटा समजले होते, तो आज एकटा नाही!

 

“गरीब को कमजोर समझने की भूल मत करना,
उसकी आह, दुआ और फरियाद—सब भगवान तक पहुँचती हैं।


और जब वक्त हिसाब करने पर आता है,
तो सत्ता के बड़े-बड़े सिंहासन भी हिल जाते हैं,
बड़े-बड़े बादशाहों को अपनी औकात समझ आ जाती है,
और ताकतवरों का गुरूर मिट्टी में मिल जाता है!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *